रेल्वे बंदमुळे नोकरदारांचे हाल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 एप्रिल 2018

दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वे बंद असल्याने नोकरदार, विद्यार्थी, कामगार आदींचे सोमवारी (ता. २३) हाल झाले. 

दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वे बंद असल्याने नोकरदार, विद्यार्थी, कामगार आदींचे सोमवारी (ता. २३) हाल झाले. 

पुणे मंडळाच्या वतीने पुणे- दौंडमधील लोहमार्गाच्या देखभाल, दुरुस्तीचे काम सोमवार (ता. २३) ते सोमवार (ता. ३०)पर्यंत हाती घेतले आहे. त्याचा लोकलसेवेवरही परिणाम होत आहे. सोमवारी (ता. २३) शिवाजीनगर- पुणे येथून ११.२० वाजता लोकल सुटली. त्यानंतर थेट दुपारी तीनला लोकल होती. तसेच, लोणावळ्याहून पुण्याकडे जाणारी लोकल ११.२० व त्यानंतर थेट दुपारी तीन वाजून ४० मिनिटांनी होती. त्यामुळे प्रवाशांना ताटकळत बसावे लागले. काही विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत, त्यांचे त्यामुळे हाल झाले. हा प्रकार आठवडाभर सुरू राहणार असल्याने प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे. 

घोरावाडी ते शिवाजीनगर प्रवास करणारे धनंजय क्षीरसागर म्हणाले, ‘‘लोकलला उशीर होणे ही आता नित्याचीच बाब झाली आहे. सकाळी ८.५२ ची लोकल सिंहगड एक्‍स्प्रेस गेल्याशिवाय सोडण्यात येत नाही. रेल्वे प्रशासनाच्या वतीने नेहमी दिलगिरी व्यक्त करण्यात येते. परंतु, सेवेत सुधारणा होत नाही.

घोरावाडी येथील रेल्वे स्टेशन मास्तरच्या कार्यालयातील तक्रार पुस्तिकेत तक्रार नोंदवूनही उपयोग होत नाही. लोकलला अर्धा तास उशीर झाला, तर प्रवाशांची संख्या वाढते. त्यामुळे गर्दीतून चढताना महिला, ज्येष्ठ नागरिकांचे हाल होतात.’’

Web Title: railway close serviceman problem