मांजरी रेल्वे फाटक 18 जूनपासून बंद

मांजरी रेल्वे फाटक 18 जूनपासून बंद

मांजरी : पुणे–दौंड रेल्वे मार्गावरील हडपसर-मांजरी रेल्वे स्थानकामध्ये येत असलेल्या मांजरी बुद्रुक येथील जिल्हा मार्गावरील रेल्वे फाकट आठरा जूनपासून बंद करण्यात येणार आहे. येथे उभारला जात असलेला उड्डाणपूल व भुयारी मार्गाच्या कामासाठी फाकट बंद होत असल्याची माहिती पुणे रेल्वे मंडळाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

मांजरी रेल्वे फाटक 18 जूनपासून बंद
पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच : अमोल कोल्हे

या ठिकाणी होत असलेल्या उड्डाणपूलाचे काम फाकटाच्या दोन्ही बाजूने नव्वद टक्केपर्यंत पूर्ण झालेले आहे. यापुढे थेट रेल्वेमार्गावरील काम करण्यात येणार आहे. हे काम करण्यासाठी तसेच भुयारी मार्गाच्या कामासाठी सध्या सुरू असलेली येथील वाहतूक काम होईपर्यंत बंद करण्यात येणार आहे. भुयारी मार्गाचे काम रेल्वेकडून करण्यात येणार असून त्यासाठी किमान सहा महिन्यांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. उड्डाणपूपुलाच्या दोन्ही बाजू जोडणारे मुख्य काम होण्यासाठी सुमारे नऊ महिन्यांचा कालावधी जाणार आहे. भुयारी पुलाचे काम झाल्यानंतर लगेचच पादचारी व हलक्या वाहनांसाठी येथील वाहतूक सुर होईल. तर, उड्डाणपूलाचे काम पूर्ण झाल्यानंतर इतर वाहनांसह सर्व प्रकारच्या वाहतूकीसाठी थेट पुलावरूनच वाहतूक सुरू होईल.

मांजरी रेल्वे फाटक 18 जूनपासून बंद
पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच : अमोल कोल्हे

"मांजरी-वाघोली रस्त्यावरून होणारी वाहतूक या काळात केशवनगर व भापकरमळा या मार्गे होणार आहे. मात्र, येथून केवळ हलक्या वाहनांची वाहतूक सुरू राहील. जड वाहनांसाठी हे मार्ग बंद ठेवण्यात आले असून त्यांना मगरपट्टा बायपासने वाहतूक करता येईल. त्याबाबतचे नियोजन करण्यात आले असून ठिकठिकाणी त्याबाबतचे सूचना फलक लावण्यात आले आहेत.

-दादासाहेब चुडाप्पा, वाहातूक पोलीस निरीक्षक, हडपसर

स्थानिक नागरिकांना पडणार मोठा वळसा- सध्या मांजरी वाघोली मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. फाटक बंद झाल्यानंतर येथील स्थानिक नागरिकांना भापकर मळा सोलापूर रस्ता किंवा केशवनगर मुंढवा मार्गे प्रवास करावा लागणार आहे. कामगार, व्यवसायीक, शेतकरी अशा दैनंदिन कामासाठी बाहेर पडणाऱ्या येथील नागरिकांना सात-आठ किलोमीटरचा वळसा घालावा लागणार आहे.

मांजरी रेल्वे फाटक 18 जूनपासून बंद
पिंपरी-चिंचवडमध्ये खासगी रुग्णालयांत केवळ ५०२ रुग्ण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com