हडपसर : टेम्पोच्या धडकेने रेल्वे फाटक तुटले; वाहतूक बंद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

हडपसर : ससाणेनगर- सय्यदनगर येथे भरधाव टेम्पोने धडक दिल्यामुळे रेल्वे गेट तुटले आहे. त्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आ

हडपसर : ससाणेनगर- सय्यदनगर येथे भरधाव टेम्पोने धडक दिल्यामुळे रेल्वे गेट तुटले आहे. त्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे.

Image
काळेपडळ येथील रेल्वे गेट सुद्धा बंद करण्यात आले असून मंहमदवाडी हांडेवाडीकडे जाणारे नागरिक रेल्वे रुळावरुन धोकादायकरित्या गाड्या नेत आहेत.

Image
रिक्षाचालकांनी रेल्वे गेट जवळ प्रचंड गर्दी केलेली आहे. प्रचंड पाऊस सुरु असून याठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून रेल्वेगेट कधी उघडणार हे याची अद्याप माहिती मिळालेली नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Railway gate collapses due to hit by tempo at hadapsar in pune