शिर्सुफळ रेल्वे गेट संदर्भात रेल्वेमंत्र्यांची भेट घेणार: सुप्रिया सुळे

संतोष आटोळे
रविवार, 8 जुलै 2018

पाणीप्रश्नावर लक्ष घालण्याची सुचना..
यावेळी ग्रामस्थांनी गावामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून नियमित पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार केली.यावेळी  खासदार सुळे यांनी याबाबत माहिती घेत पंचायत समिती सभापती संजय भोसले व सरपंच आप्पासाहेब आटोळे यांना लक्ष घालण्याच्या सुचना दिल्या.

शिर्सुफळ : बारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथील बंद करण्यात आलेल्या रेल्वे गेट संर्दभात केंद्रीय रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांची भेट घेणार आहे.तसेच यासाठी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी व ग्रामस्थ यांची बैठक घडवु असे आश्वासन बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले.

शिर्सुफळ (ता.बारामती) येथील ग्रामस्थांशी खा.सुळे यांनी संवाद साधला व मतदार संघातील अडीअडचणी जाणुन घेतल्या. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी  बारामती पंचायत समितीचे सभापती संजय भोसले, जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार, उपसभापती शारदा खराडे, पंचायत समिती सदस्य लिलाबाई गावडे, तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष संभाजी होळकर, राहुल वाबळे, राजेंद्र काटे, अनिल हिवरकर, नवनिर्वाचित सरपंच आप्पासाहेब आटोळे,  उपसरपंच अनुसया आटोळे, ग्रामसेवक दत्तात्रय धावडे ग्रामपंचायत सदस्य विश्वास आटोळे, राजेंद्र आटोळे, दादासाहेब आटोळे,  स्वप्निला आटोळे, कांतिलाल मेरगळ, हनुमंत मेरगळ, शिवाजी झगडे, संजय आटोळे,  महादेव आटोळे, यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना सुळे यांनी ग्रामस्थांनी मांडलेल्या समस्यांना उत्तरे दिली.यामध्ये तलाव परिसरातुन सुरु असलेला अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी संबंधितांना सुचना देणार असल्याचे सांगितले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड.नितीन आटोळे यांनी केले.

पाणीप्रश्नावर लक्ष घालण्याची सुचना..
यावेळी ग्रामस्थांनी गावामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून नियमित पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार केली.यावेळी  खासदार सुळे यांनी याबाबत माहिती घेत पंचायत समिती सभापती संजय भोसले व सरपंच आप्पासाहेब आटोळे यांना लक्ष घालण्याच्या सुचना दिल्या.

Web Title: railway gate issue in Shirsuphal