सय्यदनगर रेल्वेगेट तूटले; वर्षभरातली चौथी घटना

समीर तांबोळी
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

रेल्वे गेट बंद होणारी सुचना देणारा सायरन वाजतो. अशावेळी वाहनचालकांची गेट ओलांडायची जणू स्पर्धा सुरू होते. अशावेळी वाहनचालक या ठिकाणी वाहतूक नियंत्रण करणारे स्वयंसेवक इतकच काय पोलिस कर्मचारी यांना जूमानत नाही. 

उंड्री (पुणे) : सय्यदनगर येथील रेल्वेगेट बंद होत असताना चालक सचिन वाईकर याने टेम्पो (MH 12 NX 8232) घुसविण्याचा प्रयत्न केला. टेम्पो त्यात अडकल्यामुळे गेट तुटले. गेल्या दोन महिन्यामध्ये दुसऱ्यांदा आणि वर्षभरातली चौथ्यांदा ही घटना घडली आहे. त्यामुळे या रस्त्यावर प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. 

रेल्वे गेट बंद होणारी सुचना देणारा सायरन वाजतो. अशावेळी वाहनचालकांची गेट ओलांडायची जणू स्पर्धा सुरू होते. अशावेळी वाहनचालक या ठिकाणी वाहतूक नियंत्रण करणारे स्वयंसेवक इतकच काय पोलिस कर्मचारी यांना जूमानत नाही. 

सामाजिक कार्यकर्ते मुबारक इनामदार : रेल्वे गेट मुळे सततच्या कोंडी मुळे सय्यद नगर परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. जड वाहनांना प्रवेश बंद असुन त्याचे पालन होत नाही. त्यामुळे कोंडी वाढते.
माहिती अधिकार कार्यकर्ते साजिद शेख : या ठिकाणी सतत होणाऱ्या वाहतूक कोंडी, तसेच जड वाहनांना बंदी बाबत वानवडी विभाग वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक विभांडीक यांच्याशी संपर्क साधला असता पुरेसे पोलिसबल उपलब्ध नसल्याचे कारण सांगितले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Railway gate in Saiyedagar has broken