रेल्वे, मेट्रोची कंपने कमी करण्याचे आव्हान - लेक्नर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 एप्रिल 2017

पुणे - ‘‘लोहमार्गांमधून निर्माण होणारा प्रचंड आवाज (नॉइज) आणि रेल्वे किंवा मेट्रोच्या धावण्यातून निर्माण होणारी कंपने (व्हायब्रेशन) या मुख्य समस्या शहरी भागांत जाणवतात. हे कमी करण्याचे अभियंत्यांपुढे मोठे आव्हानच असते. त्यासाठी अनेकदा गुरुत्वाकर्षणाच्या आधारावर बनलेले मार्ग, हरित मार्ग असे विविध पर्याय आजमावून पाहिले जातात,’’ असे मत जर्मनीतील टेक्‍निकल युनिव्हर्सिटी म्युनिकमधील प्रा. बर्नहर्ड लेक्‍नर यांनी येथे व्यक्त केले.

भारतीय रेल्वे सिव्हिल इंजिनिअरिंग संस्थान (इरिसेन) आणि जर्मन ॲकॅडमिक एक्‍चेंज सर्व्हिस यांच्यातर्फे ‘सार्वजनिक वाहतुकीसाठी पायाभूत सुविधा’ या विषयावर नुकतेच एक व्याख्यान आयोजिले होते. या वेळी लेक्‍नर यांनी ‘नागरी रेल्वेसाठी आधुनिक लोहमार्ग’ या विषयावर मार्गदर्शन केले. याच कार्यक्रमात ‘इरिसेन’चे प्रा. सुरेश पाखरे यांनी ‘भारतीय रेल्वेचे भविष्यातील तंत्रज्ञान’ या विषयावर आपली मते मांडली.

लेक्‍नर म्हणाले, ‘‘सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी लोहमार्गांची गुणवत्ता आणि त्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या पायाभूत सुविधा अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. मार्गांवरून जाणाऱ्या वाहनांचा वेग, त्यांचे वजन, त्यांची देखभाल दुरुस्ती या गोष्टी एकाचवेळी लक्षपूर्वक पाहून त्याप्रमाणे पुढील निर्णय घेणे आवश्‍यक ठरते.’’

Web Title: Railway, Metro, the challenge to reduce vibrations