बोरघाटात दरड कोसळल्याने रेल्वेेसेवा ठप्प; रेल्वे कर्मचारी जखमी

Landslide on railway track
Landslide on railway track

लोणावळा : मंकी हिलजवळ बोरघाटात रेल्वे मार्गावर आज (सोमवारी) दुपारी दरड कोसळल्यामुळे पुण्याकडे येणारी रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. दरम्यान या घटनेत रेल्वेच्या कंत्राटदाराकडील एक कर्मचारी जखमी झाला आहे. लोणावळा- खंडाळा परिसरात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे.

या महिन्यात रेल्वे मार्गावर दरडी कोसळण्याची ही तिसरी घटना आहे. याठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना सातत्याने घडत आहे. मंकी हिल जवळ किलोमीटर क्र.115 जवळ रेल्वेच्या वतीने दुरुस्तीचे काम सुरू होते. याचदरम्यान दोन बोगद्यांच्यामध्ये डोंगरावरील मातीचा ढिगारा खाली आला. यामध्ये एक जण जखमी झाला आहे. यामुळे डाऊन आणि मिडल लाईनवरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.

गेल्या आठवड्यात बोरघाटात जामरुंग डाऊन लाईनवर मालगाडीचे सोळा डब्बे घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक तब्बल तीन दिवस विस्कळित झाली होती. आता कुठे रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर येते तोच पुन्हा दरड कोसळण्याची घटना घडली आहे. यामुळे पुण्याकडे येणाऱ्या गाड्यांचा खोळंबा झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com