रेल्वे स्थानकात कचरा टाकताय, सावधान!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

पुणे - पुणे रेल्वे स्थानक चकाचक करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. परिसर अस्वच्छ करणाऱ्या प्रवाशांना आता पाचशे रुपये दंड करण्यात येणार आहे. यासाठी ‘तेजस टीम’ निर्माण करण्यात आली आहे. तसेच अनधिकृत गाडी पार्क करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे.

पुणे - पुणे रेल्वे स्थानक चकाचक करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. परिसर अस्वच्छ करणाऱ्या प्रवाशांना आता पाचशे रुपये दंड करण्यात येणार आहे. यासाठी ‘तेजस टीम’ निर्माण करण्यात आली आहे. तसेच अनधिकृत गाडी पार्क करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे.

रेल्वे स्थानकावर कचरा टाकणे, पान आणि गुटखा खाऊन थुंकणाऱ्यांना जरब बसवण्यासाठी प्रशासनाने पाचशे रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ‘तेजस टीम’ तयार करण्यात आली आहे. त्याचबरोबर काही सफाई कामगारांचीही नियुक्ती केली आहे. स्थानक स्वच्छ ठेवणे ही प्रशासनाची जबाबदारी असली तरी, प्रवाशांनी खाद्य पदार्थांच्या पिशव्या, पाकिटे, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या कुठेही टाकतात. त्यामुळे स्थानक परिसरात अस्वच्छ होतो. हे टाळण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला असून प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन पुणे रेल्वे स्थानकाचे स्टेशनमास्तर ए. के. पाठक यांनी केले. रेल्वे कोर्टाला वीस रुपयांपासून अडीचशे रुपयांपर्यंत दंड आकारण्याचा अधिकार आहे. रेल्वे प्रशासनाने पाचशे रुपये दंड आकारण्याची परवानगी रेल्वे कोर्टाकडून घेतली आहे का, असा प्रश्‍न रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी उपस्थित केला.

रेल्वे स्थानक नेहमी स्वच्छ राहिले पाहिजे. मात्र, त्यासाठी प्रवाशांकडून पाचशे रुपये दंड आकारणे योग्य आहे का, हा प्रश्‍न आहे. तसेच ‘तेजस टीम’ला दंड आकारण्याची परवानगी देणेदेखील कितपत योग्य आहे. याबाबत फेरविचार होण गरजेचे आहे.
- हर्षा शहा, अध्यक्षा,  रेल्वे प्रवासी ग्रुप

Web Title: Railway Station Garbage Crime Fine