रेल्वे स्थानकावर हर्षा शहा यांना धक्‍काबुक्की

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

पुणे - रेल्वे प्रवासी संघाच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या हर्षा शहा यांना मद्यपीने धक्काबुक्की केल्याची घटना शुक्रवारी घडली. मद्यपीवर कारवाई करावी, अशी तक्रार शहा यांनी लोहमार्ग पोलिसांकडे दिली आहे. ही घटना पुणे रेल्वे स्थानक परिसरात घडली. 

रेल्वे स्थानकामधून शहा या शुक्रवारी जात होत्या. त्या वेळी आरडाओरडा करणाऱ्या एका मद्यपीस शहा यांनी जाब विचारला. त्या वेळी त्याने शहा यांची पर्स हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी विरोध करणाऱ्या शहा यांना मद्यपीने धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी शहा यांनी रेल्वे कर्मचारी संजय चव्हाण यांना यासंबंधी माहिती दिली. त्या वेळी चव्हाण याने त्यास हुसकावून लावले. या प्रकाराबाबत शहा यांनी लोहमार्ग पोलिसांकडे तक्रार केली आहे. मद्यपीला पळवून लावल्याप्रकरणी शहा यांनी चव्हाण यास जाब विचारला. त्या वेळी चव्हाणने शहा यांना उलट उत्तर दिले. शहा या तक्रार देण्यासाठी निघाल्या असताना मद्यपी पुन्हा दिसला. त्या वेळी शहा यांनी पुन्हा चव्हाण व नितीन शिंदे यांना त्याची माहिती दिली. त्यानंतरही त्यांनी मद्यपीवर कारवाई करण्याऐवजी त्यास बाहेर नेऊन सोडल्याचे शहा यांनी तक्रारीत म्हटले आहे.

Web Title: railway station harsha shaha push crime