रेल्वे स्टेशन मास्तरांचे उपोषण 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 ऑगस्ट 2018

ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशनने शनिवारी (ता. 11) विविध मागण्यांसाठी देशभर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. यात मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील चारशे स्टेशन मास्तर सहभागी झाले होते. 

पुणे- ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशनने शनिवारी (ता. 11) विविध मागण्यांसाठी देशभर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. यात मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील चारशे स्टेशन मास्तर सहभागी झाले होते. 

देशभरातून 35 हजार स्टेशन मास्तर या आंदोलनात सहभागी झाल्याची माहिती उपोषणकर्त्यांनी दिली. पुणे रेल्वे स्थानकात विभागातील स्टेशन मास्तरांनी हे उपोषण केले. पुणे विभागातील संघटनेचे अध्यक्ष संजय पाचपुते यांनी मागण्यांचे निवेदन रेल्वे प्रशासनाला दिले. पाचपुते म्हणाले, ""स्टेशन मास्तरांच्या "ग्रेड पे'मध्ये वाढ व्हावी, त्यांना संरक्षण भत्ता मिळावा, स्टेशन मास्तरांना 12 तास काम करावे लागते ते कमी केले जावे, स्टेशन मास्तरांपैकी 15 टक्के ज्येष्ठांना "ग्रेड बी'मध्ये समाविष्ट करावे, इत्यादी मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात आले आहे.'' 

उपोषणकर्त्यांनी यासंबंधी प्रशासनास निवेदन दिले आहे. या निवेदनातील विभागीय स्तरावरील मागण्या लवकरच सोडवल्या जातील. तसेच, इतर मागण्या वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवल्या जातील. 
- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, पुणे विभाग

Web Title: Railway Station Master strike in pune