हडपसरमध्ये 176 झोपड्यांवर रेल्वेची कारवाई

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

हडपसर : रामटेकडी व वैदूवाडी वस्तीतून जाणाऱ्या रेल्वे लाईनाचा डबल ट्रॅक करण्याकरिता रेल्वे लाईनच्या दुतर्फा असलेल्या अनधिकृत १७६ बांधकाम व झोपड्यांवर रेल्वेने कारवाई केली. पुणे रेल्वे विभागाचे अधिकारी, वानवडी व हडपसर पोलिस ठाण्याच्या उपस्थित ही कारवाई करण्यात आली. नागरिकांनी या कारवाईला विरोध केला. मात्र, पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे सायंकाळी चारपर्यंत कारवाई करण्यात आली. 

गुरुवारी सकाळी नऊ वाजल्यापासून रेल्वे विभागाने रामटेकडी व वैदूवाडी या वस्तीतून जाणाऱ्या मिरज-कोल्हापूर रेल्वे ट्रॅकच्या शेजारील जागेत मागील वीस ते तीस वर्षांपासून नागरिकांनी रेल्वेच्या जागेत अतिक्रमण करून घरे बांधली होती. मिरज रेल्वे लाईनला समांतर आणखी एक रेल्वे ट्रक उभारण्याचे काम चालू केले आहे. त्यामुळे अतिक्रमण केलेल्या जागेतून रेल्वे ट्रेक जात असल्याने मागील सहा महिन्यांपासून येथील रहिवाश्यांना घरे खाली करण्याचे नोटिसा रेल्वेकडून देण्यात आल्या होत्या. याबाबत बाधितघरांनी लिहून दिले होते, की १५ डिसेंबरपर्यंत घरे खाली करून देऊ. मात्र, त्यांनी १५ डिसेंबर होऊनही घरे खाली केली नाही. रामटेकडी रामनगर रेल्वे ट्रॅकच्या बाजूकडील नऊ मीटर व वैदूवाडी बाजूकडील वीस मीटर जागा रिकामी करण्यात आली.

रामटेकडीतील ११८ तर वैदूवाडी भागात ५८ झोपड्या जेसीबी व रेल्वे, हडपसर व वानवडी पोलिसांच्या उपस्थित जमीनदोस्त करण्यात आले. याप्रसंगी रेल्वेचे असिस्टंट डिव्हिजनल इंजिनिअर योगेंद्र भैस यांच्या मार्गदर्शनखाली ही कारवाई करण्यात आली. यामध्ये रेल्वेचे 30 पोलिस व वानवाडीचे ५० व हडपसरचे १५ पोलिस कर्मचारी उपस्थित होते. 
 
Web Title: Railway Takes action on 176 huts in Pune