रेल्वे आरक्षणासंदर्भात महत्त्वाची बातमी; एक जूनपासून...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

- पुणे रेल्वे स्थानकावरून शुक्रवारपासून तिकिटांचे आरक्षण सुरू.

- रद्द झालेल्या गाड्यांच्या तिकिटांचे पैसे (रिफंड) 25 मे पासून प्रवाशांना मिळणार

पुणे : रेल्वे गाड्यांच्या तिकिटांचे आरक्षण करण्यासाठीची सुविधा पुणे रेल्वे स्थानकावरून शुक्रवारपासून सुरू झाली. सकाळी आठ ते रात्री आठ दरम्यान आरक्षण खिडक्या सुरू असतील. तर, रद्द झालेल्या गाड्यांच्या तिकिटांचे पैसे (रिफंड) 25 मे पासून प्रवाशांना मिळणार आहे. देशात एक जूनपासून मर्यादित प्रमाणात रेल्वे वाहतूक सुरू होणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

देशातून विविध भागात प्रवास करण्यासाठी 200 रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. पुण्यातून पुणे- पाटना ही गाडी एक जूनपासून सुरू होणार आहे. तसेच मुंबई - भुवनेश्वर कोनार्क एक्स्प्रेस, निजामुद्दीन- गोवा, मुंबई - हैदराबाद हुसेनसागर एक्सप्रेस, मुंबई- गदग आदी गाड्या पुण्यातून पुढे जातील. त्यामुळे त्यांचेही आरक्षण प्रवाशांना उपलब्ध होऊ शकते. त्यानुसार पुणे रेल्वे स्थानकावर आरक्षणाच्या तीन खिडक्या सुरू करण्यात आल्या आहेत. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून प्रवाशांना आरक्षण मिळेल. तोंडाला मास्क नसलेल्या प्रवाशांना स्थानकाच्या आवारात प्रवेश मिळणार नाही, असेही मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी सांगितले.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रिफंड 25 मे पासून

कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे रेल्वेची वाहतूक 25 मार्चपासून बंद आहे. या काळात रद्द झालेल्या प्रवासी वाहतुकीच्या रेल्वे गाड्यांच्या तिकिटांचे पैसे 25 मे पासून रेल्वे स्थानकावर मिळणार आहे. रिफंड पुढील सहा महिन्यांपर्यंत मिळणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी एकदम गर्दी करू नये, असे आवाहन झंवर यांनी केले. ज्या प्रवाशांनी ऑनलाईन पद्धतीने तिकिट, आरक्षण घेतले असेल त्यांनी तिकिट खिडकीवर येऊ नये. त्यांना ऑनलाईन पद्धतीनेच रिफंड मिळणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Indian Railways to become world's first 100 per cent 'Green rail ...

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एक लाख मजूर पाठविले रेल्वेच्या पुणे विभागातून 7 मे पासून 77 श्रमिक स्पेशल रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या. त्यातून एक लाख मजूर, कामगार मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, उत्तराखंड, छत्तीसगढ, जम्मू-काश्मीर, मणिपूर आदी राज्यांत आपआपल्या गावी परतले आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे स्थानकावरून 39 श्रमिक स्पेशल रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या. त्यातून सुमारे 50 हजार मजुरांनी प्रवास केला. उर्वरित गाड्या कोल्हापूर, मिरज, सातारा, उरुळी आदी स्थानकांवरून गेल्या आहेत. या गाड्यांतील प्रवाशांना रेल्वेतर्फे जेवणाचे पॅकेटस देण्यात आले होते. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या व्यवस्थापक रेणू शर्मा यांच्या नेतृत्त्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला, असे झंवर यांनी स्पष्ट केले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Railway Ticket Reservation Started in Pune Railway Station