पावसामुळे पुणे-मुंबई दरम्यान अनेक रेल्वेगाड्या रद्द

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 ऑगस्ट 2019

मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेने खबरदारी घेत पुणे-मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेस, पुणे-मुंबई डेक्कन क्वीन, मुंबई-सोलापूर सिद्धेश्वर एक्स्प्रेस या गाड्या रविवारी रद्द करण्यात आल्या तर सोमवारी पुणे-भुसावळ-पुणे एक्स्प्रेस, मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.

पुणे : मुंबईसह परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रेल्वे रूळ पाण्याखाली गेला आहे. तसेच घाट भागात झालेल्या जोरदार पावसामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे रविवारी पुणे-मुंबई दरम्यान अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्यांच्या मार्गात बदल केला आहे. 

मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेने खबरदारी घेत पुणे-मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेस, पुणे-मुंबई डेक्कन क्वीन, मुंबई-सोलापूर सिद्धेश्वर एक्स्प्रेस या गाड्या रविवारी रद्द करण्यात आल्या तर सोमवारी पुणे-भुसावळ-पुणे एक्स्प्रेस, मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.

तसेच पुणे-मुंबई दरम्यानची वाहतूक बहुतांश बंद करण्यात आली आहे. त्यामुळे लांब पल्याच्या अनेक गाड्या मुंबई ते पुणे दरम्यान रद्द केल्या असून या गाड्या पुणे स्थानकातून पुढे सोडण्यात येणार आहे. तर काही गाड्या दौंड-मनमाड मार्गे वळविण्यात आल्या आहेत. अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली. तसेच पावसाच्या स्थितीनुसार पुढील नियोजन करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rain affect on Mumbai pune railway traffic