पुण्यात उद्या पुन्हा पाऊस

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

- किमान तापमान 19 तर कमाल 31 अंश सेल्सिअस राहणार

पुणे : शहरात शनिवारी (ता. 2) आकाश अंशत: ढगाळ राहील. शहर परिसरात पावसाच्या हलक्‍या सरी कोसळतील, असा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्‍त केला आहे. तसेच शनिवारी दिवसभरात किमान तापमान 19 अंश सेल्सिअस तर, कमाल 31 अंश सेल्सिअस राहणार आहे.

शहरात आज दिवसभर ढगाळ वातावरण होते. किमान तापमान आज 22.2 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 27.6 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. सायंकाळी सहा वाजेपर्यंत काही भागात पावसाच्या हलक्‍या सरी कोसळल्या. शहरात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उणे 3.5 अंश सेल्सिअसने घट झाली.

वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण 90 टक्‍के इतके होते. रविवारी (ता. 3) आकाश अंशत: ढगाळ राहील, अशी शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain again on tomorrow in Pune