आंबेगाव तालुक्यात अवकाळी पावसाने कांद्याचे नुकसान

सुदाम बिडकर
सोमवार, 14 मे 2018

अचानक आलेल्या पावसामुळे शेतात काढणी सुरु असलेला कांदा व बाजरी झाकण्यासाठी शेतकर्यांची धांदल उडाली काही शेतकर्यांचा कांदा तसेच बाजरीची कणसे भिजुन नुकसान झाले. आंब्याच्या झाडाच्या कैऱ्या गळुन पडल्यानेही नुकसान झाले.

पारगाव, (पुणे) : आंबेगाव तालुक्याच्या पुर्वभागातील पारगाव, काठापुर बुद्रुक, जारकरवाडी, परिसरात काल रविवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतात काढुन ठेवलेल्या उन्हाळी बाजरीची कणसे व कांदा भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

तालुक्याच्या पुर्वभागात जारकरवाडी, पारगाव व काठापुर बुद्रुक आदी गावात कांदा काढणीची कामे सुरु आहेत.डिंभा उजवा कालवा आणि घोडनदीच्या पाण्यामुळे याभागात उन्हाळी बाजरीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते सध्या बाजरी काढणीचेही काम सुरु आहे. काल सकाळपासुन वातावरणात उकाडा जाणवत होता सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाला सुरवात झाली. सुमारे अर्धा ते पाऊण तास पाऊस पडत होता रस्त्यावरुन पाणी वाहु लागले तर सखल भागात पाणी साचले आहे.

अचानक आलेल्या पावसामुळे शेतात काढणी सुरु असलेला कांदा व बाजरी झाकण्यासाठी शेतकर्यांची धांदल उडाली काही शेतकर्यांचा कांदा तसेच बाजरीची कणसे भिजुन नुकसान झाले. आंब्याच्या झाडाच्या कैऱ्या गळुन पडल्यानेही नुकसान झाले.

Web Title: rain in ambegaon