बारामती शहरात मुसळधार पाऊस

rain
rain

बारामती : शहरात आज पहाटेपासूनच मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसाने वातावरण पार बदलून गेले असून शहरात ठिकठिकाणी पाण्याची मोठी तळी साचली आहेत. या मुसळधार पावसाने बारामतीचे जनजीवनच आज विस्कळीत झाले आहे. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा
काल मध्यरात्रीनंतरच बारामतीत मुसळधार पावसास प्रारंभ झाला. थांबून थांबून पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. सकाळी साडेसातनंतर पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला. काही मिनिटातच रस्त्यावरुन पाण्याचे पाट वाहू लागले होते तर अनेक ठिकाणी पाण्याची मोठी तळी साचली होती. या पावसाने हवेत एकदमच गारवा निर्माण झाला. 

सकाळपासून पावसास प्रारंभ झाल्याने आज दैनंदिन जीवनावर याचा चांगलाच परिणाम जाणवला. बारामतीचे जनजीवन पावसाने विस्कळीत झाले. रस्त्यांवर शुकशुकाट होता तर शाळातून उपस्थितीही तुरळकच होती. 

यंदाच्या पावसाळ्यात पावसाने बारामतीकडे पाठ फिरवीली होती त्या मुळे तालुक्याच दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती. या अवकाळी पावसाने पिकांचे नुकसानच अधिक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कालपासूनच बारामती पंचक्रोशीत ढगाळ वातावरण होते मात्र इतका मोठा पाऊस कोसळेल अशी सुतरामही शक्यता कोणालाच वाटली नव्हती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com