पावसाने जनजीवन विस्कळित

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जुलै 2018

मांजरी - संततधार पावसाने पूर्व भागातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळित झाले. हडपसर- मांजरी परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी पाण्याची तळी साठली आहेत. वाहतुकीचा बट्ट्याबोळ झाला होता.    
सोलापूर रस्ता, मांजरी रस्ता, सिरम कंपनी रस्ता आदी ठिकाणचे खचलेले रस्ते, नादुरुस्त गटारे यांमुळे ठिकठिकाणी पाण्याची तळी निर्माण झालेली आहेत.
मांजरी फाट्यावरून अण्णासाहेब मगर महाविद्यालयापर्यंतच्या सांडपाणी वाहिनीतील पाण्याचा निचरा होत नसल्याने ठिकठिकाणी घाण पाण्याची तळी साचली आहेत. दुर्गंधीने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. 

पंधरा नंबर फाटा, मांजरी रस्त्यावरील मणिरत्न  आंगण सोसायटी व रविदर्शन चौक, सिरम रस्ता, डीपी रस्ता आदी ठिकाणी सांडपाणी वाहिनी व पावसाळी गटारांची दुरवस्था झाली आहे.

पालिकेकडून केवळ कामांचा दिखाऊपणा केला जात आहे. कामाची गरज आणि दर्जा याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळेच दरवर्षी प्रत्येक पावसात नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
-प्रतिमा तुपे, स्थानिक रहिवासी

सध्याच्या परिस्थितीची अभियंत्यांकडून पाहणी करण्यात येत आहे. गरज असेल तेथे तत्काळ उपाययोजना केली जाईल.
- सुनील यादव, सहायक आयुक्त, हडपसर क्षेत्रीय कार्यालय.

Web Title: Rain causes disruption of life