दौंड तालुक्यातील नानगावात पाऊस

रमेश वत्रे
गुरुवार, 4 एप्रिल 2019

नानगाव ( ता.दौंड ) येथे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. सायंकाळी सातच्या सुमारास सुरू झालेला पाऊस अर्धा तास चालू होता. या पावसामुळे गव्हाच्या पिकाचे नुकसान झाले.

केडगाव, जि.पुणे : नानगाव ( ता.दौंड ) येथे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. सायंकाळी सातच्या सुमारास सुरू झालेला पाऊस अर्धा तास चालू होता. या पावसामुळे गव्हाच्या पिकाचे नुकसान झाले.

वाऱ्यामुळे नानगाव-पारगाव रस्त्यावरील काही गुऱ्हाळांवरील पत्रे उडाले असून, काही घरांचे पत्रे उचकटले आहेत. या वादळी वाऱ्याचा डाळिंबाच्या बागांच्या कळी गळाल्याचे शेतकरी प्रल्हाद रासकर यांनी सांगितले.

नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याची मागणी दीपक पवार यांनी केली आहे. वादळी वाऱ्यामुळे नानगाव भागातील वीज पुरवठा खंडीत झाला. केडगाव व चौफुला परिसरात विजांचा कडकडाट व ढगाळ वातावरण तयार झाले होते. मात्र, ठिकाणी पाऊस पडला नाही. वातावरणात आज दिवसभर उकाडा जाणवत होता. ढगाळ वातावरणामुळे चौफुला केडगाव परिसरातील विटभट्टी मालकांची विटा झाकण्यासाठी तारांबळ उडाली. वाऱ्यामुळे धुळीचे लोट उठले होते.

Web Title: Rain in Daund Nangaon Pune