राज्यात पुढील दोन दिवस सर्वदूर पावसाची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

मॉन्सून पुन्हा सक्रिय झाल्याने राज्यात हलक्‍या ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. उत्तर महाराष्ट्रात असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे उत्तर कोकण, गुजरातमध्ये पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. राज्यात पुढील दोन दिवसांमध्ये सर्वदूर पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पुणे - मॉन्सून पुन्हा सक्रिय झाल्याने राज्यात हलक्‍या ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. उत्तर महाराष्ट्रात असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे उत्तर कोकण, गुजरातमध्ये पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. राज्यात पुढील दोन दिवसांमध्ये सर्वदूर पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

राज्यात पावसाने आठवडाभर ओढ दिली होती. त्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या विविध भागांत पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्याच्या काही भागांत पाऊस पडत आहे. मध्य महाराष्ट्रासह विदर्भात अनेक ठिकाणी पावसाच्या दमदार सरी पडत आहेत. मध्य महाराष्ट्रावर हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे.
दक्षिणेकडील राज्यांमध्ये आणि पश्‍चिम बंगालमध्येही हवेचा कमी दाब निर्माण झाला आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain Environment Maharashtra