शहरात पूर्व मोसमी पाऊस

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

पुणे - शहरात विविध ठिकाणी सायंकाळी पूर्व मोसमी पावसाने हजेरी लावली. एरंडवणा, कोथरूड, शिवाजीनगर, स्वारगेट परिसरात हा पाऊस झाला. दरम्यान, मध्य-महाराष्ट्र, कोकण-गोवा, मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी पाऊस झाल्याचे हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

गेल्या काही दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्राच्या तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. तसेच, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांतही तापमानात किंचित वाढ झाली आहे. दरम्यान, राज्यात चंद्रपूरमध्ये सर्वाधिक 47.6 अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद झाली. पुण्यात 40. 8 आणि लोहगावमध्ये 41.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले.

विदर्भात काही ठिकाणी शुक्रवारी (ता.18) उष्णतेची लाट येण्याची शक्‍यता आहे. दक्षिण कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात शनिवारी (ता.19) तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल. पुण्यात शुक्रवारी आणि शनिवारी आकाश निरभ्र राहील, असा अंदाज आहे.

Web Title: rain environment pune