पुणेकरांनो, सायंकाळी पाऊस वाढण्याचा अंदाज; विसर्ग वाढण्याची शक्यता

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

- शहरात सायंकाळी पाऊस वाढण्याचा अंदाज आहे.
- खडकवासला धरणातील विसर्ग वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
- खबरदारी म्हणून पुढील तीन दिवसांसाठी उपाययोजना करण्यात येणार आहे
- महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासमवेत महापालिकेतील वरिष्ठ अधिकारयांची दुपारी चार वाजता बैठक होईल.

पुणे : शहरात सायंकाळी पाऊस वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे खडकवासला धरणातील विसर्ग वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. खबरदारी म्हणून पुढील तीन दिवसांसाठी उपाययोजना करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासमवेत महापालिकेतील वरिष्ठ अधिकारयांची दुपारी चार वाजता बैठक होईल. 

विशेषत: आपती व्यवस्थापन आणि आगनिशामक दलाला काही सूचना केल्या जाणार आहेत. त्याआधी पाणी शिरण्याची शक्यता असलेल्या भागांतील लोकांना हलविण्याची तयारी महापालिकेने केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain forecast for evening in Pune