नक्षत्राच्या वाहनाप्रमाणे पावसाचे प्रमाण

रोशन भामरे 
बुधवार, 6 जून 2018

तळवाडे दिगर - हवामानशास्त्र कितीही प्रगत झाले तरी पावसाचे अंदाज बांधताना अनेकदा तफावत आढळते अथवा चुकतात. मात्र शेतकऱ्यांना अवगत असलेले प्राचीन ज्ञान सहसा चुकीचे ठरत नाही.या शास्त्राला लिखित स्वरूप नसले तरी पावसाचे तंतोतंत भाकीत करणारी मंडळी गावोगावी असतात.नक्षत्रावरून पाऊस जोडणारी ही कला जितकी उपयुक्त तितकीच मनोरंजक आहे.

कडक उन्हानंतर रोहिणी नक्षत्रात पावसाचे सर्वदूर आगमन झाले आहे. सुरुवातीलाच सर्वदूर पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यातून समाधान व्यक्त करत आहेत.आकाशाला झाकोळून टाकणारे कृष्णमेघ वर्षाराणीच्या आगमनाची ग्वाही देत आहेत. यंदा उन्हाचा पारा ४४ ते ४६ अंशापर्यंत गेला. त्यामुळे पाऊस चांगला पडेल असा अंदाज बांधण्यात येत आहे. आता सर्वसामन्य नागरिकांपासून ते बाळीराजापार्यंत सर्वांनाच प्रतीक्षा लागून राहिली आहे. ती मृग नक्षत्राला आगमनाची ती वेळ आता जवळ आली असून ८ जूनपासून मृग नक्षत्राला प्रारंभ होत आहे.

पंचाग तसेच अन्य जुन्या साधनानुसार पावसाचा अंदाज बांधला जात आहे. यात प्रत्येक नक्षत्राला वाहन देऊन त्याचप्रमाणे किती पाउस पडेल याचा अंदाजानुसार पावसाची लक्षणे सांगण्यात आली आहेत.

नक्षत्र - वाहन- पावसाचे- स्वरूप- कालावधी
मृग- मेंढा- हुलकावणी देणारा- ८ जून ते २१ जून
आर्दा- हत्ती- सरसरी पाऊस-२२ जून ते ५ जुलै
पुनर्वसू- बेडूक- हुलकावणी- देणारा- ६ जुलै ते १९ जुलै
पुष्य- गाढव- कुठे जास्त कुठे कमी- २० जुलै ते २ ऑगस्ट
आश्लेषा- घोडा- सामान्य पाऊस- ३ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट
मेघा- उंदीर- पावसाची उघडझाप- १७ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट
पूर्वा- हत्ती- सरासरी पाऊस ३१ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर
उत्तरा-मेंढा- हुलकावणी देणारा- १३ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर
हस्त- म्हैस- सरासरी पाऊस- २७ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर
चित्रा- कोल्हा- संमिश्र पाऊस- १० ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर
स्वाती- मोर- सामान्य पाऊस- २४ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर

Web Title: rain forecast by panchang