पुणे : आंबेगाव तालुक्यात पावसाची विश्रांती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

आंबेगाव तालुक्यात गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस शुक्रवारी थांबल्याचे चित्र पाहावयास मिळाले, पण वाऱ्याची तीव्रता मात्र वाढलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून हाेत आसलेल्या मुसळधार पावसामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले होते.

मंचर : आंबेगाव तालुक्यात गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस शुक्रवारी थांबल्याचे चित्र पाहावयास मिळाले, पण वाऱ्याची तीव्रता मात्र वाढलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून हाेत आसलेल्या मुसळधार पावसामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले होते.

विशेषतः शेतीमालाला या पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. दरम्यान, सातगाव पठार भागातील बटाटा पीक व 56 गावांतील भात पीक मोठ्या प्रमाणात पुरात वाहून गेल्याच्या शेतकर्‍यांच्या तक्रारी आहेत. घोडेगाव, मंचर, रांजणी, अवसरी खुर्द, पारगाव, लाखनगाव, गावडेवाडी, पिंपळगाव, खडकी, कळंब या भागातील फ्लाॅवर, कोबी व भाजीपाला पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या पाऊस थांबला असला तरी सूर्यदर्शन मात्र, झालेले नाही. वाऱ्याची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे पावसाची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, नुकसान झाल्यामुळे बटाटा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. लागवड केलेले पेठ, कुरवंडी, कारेगाव, कोल्हारवाडी, थूगाव, पारगाव तर्फे खेड, भावडी येथील बटाटे जमिनीत सडून गेल्याने मोठे आर्थिक संकट शेतकऱ्यांवर ओढावले आहे. अनेक शेतकरी शेतात साचलेले पाणी काढून देण्यासाठी धावपळ करताना सध्या दिसत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain has stopped in Ambegaon