झिम्म पावसाची तरुणाईला साद 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जून 2018

पुणे : रिमझिम पाऊसधारा अन्‌ ती ओली पायवाट...मग तरुणाईला ओढ लागते ती पावसाळी भटकंतीची. गडकिल्ल्यांसह वेगवेगळ्या डेस्टिनेशनला फिरायला जाण्याचे तरुण-तरुणींचे नियोजन असून, विविध ट्रेकिंग ग्रुपने आयोजिलेल्या वर्षासहलींना तरुणाईची पसंती मिळत आहे. राज माचीपासून लोहगडपर्यंत...लोणावळ्यापासून कोकणपर्यंत भटकंतीसाठी हटके डेस्टिनेशनला तरुणाई भर देत आहे. 

पुणे : रिमझिम पाऊसधारा अन्‌ ती ओली पायवाट...मग तरुणाईला ओढ लागते ती पावसाळी भटकंतीची. गडकिल्ल्यांसह वेगवेगळ्या डेस्टिनेशनला फिरायला जाण्याचे तरुण-तरुणींचे नियोजन असून, विविध ट्रेकिंग ग्रुपने आयोजिलेल्या वर्षासहलींना तरुणाईची पसंती मिळत आहे. राज माचीपासून लोहगडपर्यंत...लोणावळ्यापासून कोकणपर्यंत भटकंतीसाठी हटके डेस्टिनेशनला तरुणाई भर देत आहे. 

केरळ, गोवा, चेरापुंजी (मेघालय), कर्नाटक, तमिळनाडू, हिमाचल प्रदेश, राजस्थान, उत्तरागड, पॉंडिचेरी, मध्य प्रदेश अशा विविध राज्यांतील पावसाळी पर्यटनस्थळांना जाण्याचेही तरुणाईचे नियोजन आहे. सध्या ट्रेक्रिंग ग्रुप आणि गिर्यारोहक संस्थांद्वारे पावसाळी ट्रिप काढल्या जात आहेत. त्याची माहिती फेसबुक, व्हॉट्‌सऍप, इन्स्टाग्राम आणि ग्रुपच्या संकेतस्थळातून प्रसिद्धी केली जात आहे. 1 ते 2 हजार रुपयांमध्ये या ट्रिपचे बुकिंग केले जात आहे. 

धबधबे अन्‌ गडकिल्ल्यांना पसंती 
पावसाळ्यात सह्याद्री पर्वतरांगामधील धबधब्यांच्या ठिकाणांवर दरवर्षी गर्दी असते. ताम्हिणी घाटापासून अंबोली घाटापर्यंत विविध धबधब्यांच्या ठिकाणांना यंदाही पावसात तरुणाई भेट द्यायला सज्ज झाली आहे. सिंहगड, राजमाची, लोहगड, प्रतापगड, शिवनेरी, रायगड, तुंग किल्ला, तिकोना, कोरीगड, पन्हाळा, हरिश्‍चंद्र, राजगड, रतनगड, हरिहरगड अशा विविध गडकिल्ल्यांना पावसाळ्यातही तरुणाई आर्वजून भेट देणार आहे. 

पावसाळ्यात निसर्गाचे सौंदर्य वेगळेच असते. त्यामुळे भटकंती करताना छायाचित्र टिपायला मला खूप आवडते. सिंहगड, लोणावळा, खंडाळा, पानशेत या ठिकाणी बाइकवर फिरतो. पावसाळ्यात फ्रेश हवा आणि गारवा अनुभवण्यासाठी भटकंतीसाठी बाहेर पडावे; पण त्यादृष्टीने काळजीही घ्यायला हवी. 
- पंकज जाधव 

पावसात नव्या ठिकाणांना भेटी द्यायला तरुणांना आवडते. म्हणूनच आम्ही नवी ठिकाणे शोधून ट्रेकिंगला जातो. सोशल मीडियाद्वारे त्याची प्रसिद्धी केली जाते आणि त्याद्वारे तरुण-तरुणींना आम्ही ट्रेकिंगला नेतो. बाइकवर तरुण मंडळी भटकंतीला जातात. म्हणूनच मुळशी, खडकवासला, पानशेत, लोणावळा, खंडाळा, माळशेज अशा ठिकाणांमध्ये गर्दी होते. 
- अमित कोदेरे, पावसाळी ट्रेक आयोजक 

भटकंती करताना ही घ्या काळजी... 
- पावसाळ्यात फिरायला जाण्यापूर्वी त्या स्थळाची व मार्गाची पूर्णपणे माहिती घ्यावी. सोबत गाइड व माहिती पुस्तिका ठेवावी. 
- ट्रेकिंगला जाताना पायात ट्रेक किंवा स्पोर्ट शूज घाला. 
- नदी व समुद्राच्या पाण्याचा अंदाज घेऊनच प्रवाहात उतरा. 
- वॉटरप्रूफ बॅग घेऊन भटकंतीला निघावे. 
- तुम्ही जर सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करणार असाल तर त्याचे वेळापत्रक सोबत ठेवा. 
- स्टेपनी, टूल, प्रथमोपचार पेटी, मेणबत्ती, काडीपेटी, औषधसामग्री आणि ओळखपत्र जवळ ठेवा. 

पावसाळी पर्यटनस्थळे 
मुंबई, कोकण, गोवा, कास पठार, भीमाशंकर, महाबळेश्‍वर, लोणावळा, खंडाळा, सिंहगड, खडकवासला, पानशेत, कामशेत, मुळशी, रायगड, कोल्हापूर, भीमशंकर, जुन्नर, पाचगणी व माथेरान. 

 

Web Title: rain invite youth to enjoy