धरण क्षेत्रात जोरदार पावसाची हजेरी

Rain
Rain

पुणे - उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रात मॉन्सून सक्रिय झाला आहे. घाटमाथा आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडत आहे. पुढील दोन दिवसांमध्ये कोकणाच्या काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

मध्य महाराष्ट्राच्या काही भागांसह मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) देशाच्या बहुतांश भाग व्यापला आहे. राजस्थान, पंजाबच्या काही भागांसह संपूर्ण देश व्यापण्यास आणखी काही काळ लागणार आहे. 

देशाच्या अनेक भागांत मॉन्सून सक्रिय झाला आहे. आसाम, मेघालय, गोवा, कोकण, अरुणाचल, उत्तर प्रदेश या राज्यांतील काही भागांत मुसळधार पाऊस पडत आहे. राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्रासह विविध ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली. मात्र, मराठवाडा व विदर्भाच्या बहुतांश भागांत पावसाने अजूनही ओढ दिली आहे.

पुण्यात ३६२ मिमी पाऊस 
शहर परिसरात पुढील दोन-तीन दिवस पावसाच्या हलक्‍या सरी पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. गुरुवारी सकाळपासून पावसाच्या तुरळक सरी पडल्या. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत २.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. १ जूनपासून आतापर्यंत ३६२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com