Fri, June 9, 2023

Rain News Updates : उंड्री-पिसोळी, वडकी परिसर अवकाळी पावसाची हजेरी
Published on : 16 March 2023, 12:17 pm
उंड्री : दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आज (गुरुवार, दि. १६ मार्च, २०२३) सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसाने दिलासा दिला. उंड्री, पिसोळी, वडकी, परिसरात सायंकाळी चारच्या सुमारास आकाशामध्ये ढग दाटून आले आणि ढगांच्या गडगडाट आणि विजांच्या कडकडाट सुरू होता.
वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. दिवेघाटातील रस्ता ओलसर झाल्याने दुचाकी आणि वाहनचालकांना कसरत करावी लागली. विद्युत प्रवाह खंडित झाल्याने नागरिकांना अंधाराशी सामना करावा लागला. रस्त्यावरून पाणी वाहू लागल्याने वाहनांचा वेग मंदावला होता. दिवेघाटातून पाणी वाहत असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने सावकाश वाहने चालविणे पसंत केल्याचे वाहनचालकांनी सांगितले.