दुसऱ्या दिवशीही पावसाची हजेरी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

पिंपरी  - शहरामध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. सकाळपासूनच वातावरणात उकाडा होता. दुपारनंतर पावसाला सुरवात झाली. त्यामुळे वातावरण आल्हाददायक झाले. 

पिंपरी  - शहरामध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. सकाळपासूनच वातावरणात उकाडा होता. दुपारनंतर पावसाला सुरवात झाली. त्यामुळे वातावरण आल्हाददायक झाले. 

गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिलेली आहे. त्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा पावसाला सुरवात झाली आहे. शहरात बुधवारी (ता. २०) पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वाहनचालकांनी पाऊस थांबेपर्यंत रस्त्याच्या कडेला, भुयारी मार्गामध्ये आडोसा घेतला. पाऊस थांबल्यानंतर ते पुन्हा मार्गस्थ झाले. शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची मात्र, चांगलीच तारांबळ उडाली. शहरातील विविध ठिकाणी खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचले होते. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागली.

Web Title: rain in pimpri

टॅग्स