पावसाच्या सरींनी पुणेकर सुखावले!

रविवार, 13 मे 2018

पुणे : अनेक दिवसांपासून उकाडा आणि वाढत्या तापमानाचा सामना करणारे पुणेकर, अचानक आलेल्या पावसाच्या सरींनी चांगलेच सुखावले. मागील काही दिवसांपासून पुण्यातील तापमानाचा पारा 40 अंशाच्यावर गेले होता. आज (रविवार) दुपारी साडेचारच्या सुमारास शहरातील शिवाजीनगर, पेठांचा परिसर, डेक्कन, एरंडवणे सोबतच पाषाण, धायरी, खडकवासला आदी उपनगर आणि त्याच्या जवळील परिसरात पाऊसाच्या हलक्या सरी झाल्या. विजांचा कडकडाटासह, वाराही सुटला होता. 

स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने यंदा मान्सून केरळ राज्यात चार दिवस आधीच दाखल होण्याचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार 28 मे ला केरळात दाखल होणारा मान्सून त्याच्या पुढील आठ दिवसात म्हणजेच अंदाजे 5 किंवा 6 जूनला महाराष्ट्रात दाखल होईल असा अंदाज  होता. परंतु, अचानक आलेल्या पाऊसाने हवामानशास्त्र विभागाला पुन्हा मान्सूनचा अंदाज लावण्याची गरज निर्माण झाली आहे. 

Web Title: rain in pune