पुणेकरांना पावसाने झोडपले 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 सप्टेंबर 2016

पुणे - उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना बुधवारी सायंकाळी थोडा वेळ मुसळधार पावसाने झोडपले. रात्री आठ वाजेपर्यंत 5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुढील दोन दिवसांमध्ये शहर आणि परिसरात पावसाच्या हलक्‍या सरी पडतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

शहरात गेल्या आठवड्यापासून पावसाने उघडीप दिल्याने सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस "ऑक्‍टोबर हीट'चा प्रभाव जाणवू लागला आहे. राज्याच्या उकाड्यातही वाढ झाली आहे. शहरातील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअसपर्यंत वाढले असून, किमान पारा 20 अंश सेल्सिअस नोंदला गेला. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत उकाडा जाणवत होता. त्याचवेळी आकाश ढगांनी व्यापले होते. 

शहराच्या मध्य वस्तीसह सिंहगड रस्ता, कोथरूड, पाषाण, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर, कात्रज भागात मुसळधार पाऊस पडला. या भागात रस्त्यांवर पाणी वाहू लागले होते. अचानक आलेल्या या पावसामुळे शाळेतून घरी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची; तसेच कार्यालयातून परतलेल्या कर्मचाऱ्यांची धांदल उडाली. 

राज्यात येत्या शनिवारपासून (ता. 1) पुन्हा पावसाला सुरवात होणार असून, रविवारी (ता. 2) विदर्भ, मराठवाडा, कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्‍यता आहे. बुधवारी पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडला. उर्वरित राज्यांत हलक्‍या सरी; तर पुण्यात जोरदार सरी पडल्या. 
पूर्व उत्तर प्रदेशापासून तेलंगणपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा बुधवारी सक्रिय होता. छत्तीसगड आणि परिसरावर समुद्र सपाटी चक्राकार वारे वाहत होते. पावसाला अनुकूल वातावरणीय स्थिती निवळल्याने बहुतांशी भागांत पावसाने सध्या उघडीप दिली आहे.

Web Title: Rain in pune