आगामी चार दिवसांत पावसाची उघडीप

Rain
Rain

पुणे - राज्यात मॉन्सूनचा जोर ओसरला आहे. पुढील चार दिवसांमध्ये राज्यात सर्वदूर पावसाची उघडीप राहील, असा अंदाज हवामान खात्यातर्फे रविवारी वर्तविण्यात आला आहे. शहर आणि परिसरात पुढील दोन दिवस पावसाच्या एक-दोन सरी पडण्याची शक्‍यता असल्याची माहिती देण्यात आली.

राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह ऊन-सावल्यांचा खेळ सुरू असून, अधून-मधून पावसाच्या सरीचा शिडकावा होत आहे. राज्यात पाऊस थांबल्यानंतर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात दिवसाचे तापमान सरासरीच्या वर गेले आहे. अनेक ठिकाणी पारा 30 अंश सेल्सिअसच्या वर गेला आहे. ढगाळ हवामानामुळे विदर्भात पारा सरासरीच्या खाली असला, तरी त्यात हळूहळू वाढ होत आहे. उन्हाच्या चटक्‍याबरोबर राज्यात उकाडाही वाढला आहे. मराठवाडा वगळता राज्यात रात्रीचे तापमान सरासरीच्या जवळपास आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा फिरोजपूरपासून उत्तर अंदमान समुद्रापर्यंत सक्रिय आहे. उत्तरेकडे सरकलेला मॉन्सूनचा आस, विषुववृत्ताच्या दक्षिणेकडून येणाऱ्या मॉन्सून प्रवाहाचा मंदावलेला वेग यामुळे महाराष्ट्रासह दक्षिण भारतात पाऊस ओसरला आहे. गुरुवारपर्यंत (ता. 6) कोकणात काही ठिकाणी, तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com