शहर आणि परिसरात हलक्‍या सरींची हजेरी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

 शहर आणि परिसरात गुरुवारी सकाळी पावसाच्या हलक्‍या सरींनी हजेरी लावली. गणरायाच्या आगमनाच्या दिवशीही शहरात हलक्‍या पावसाची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

पुणे - शहर आणि परिसरात गुरुवारी सकाळी पावसाच्या हलक्‍या सरींनी हजेरी लावली. गणरायाच्या आगमनाच्या दिवशीही शहरात हलक्‍या पावसाची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे. दरम्यान, कोल्हापूर आणि सातारा येथील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. 

शहरात ढगाळ वातावरण आहे. पावसाच्या हलक्‍या सरी अधूनमधून हजेरी लावत आहे. सकाळी आलेल्या सरीमुळे पुणेकरांनी बऱ्याच दिवसांनंतर पुन्हा पावसाच्या अनुभव घेतला. सकाळी कार्यालयात आणि शाळेत जाण्याच्या वेळेतच पावसाने हजेरी लावल्याने जर्किन, रेनकोट घालून घराबाहेर पडणारे पुणेकर दिसत होते. दुपारी बारा वाजेपर्यंत पावसाच्या सरी पडत होत्या. सिंहगड रस्ता, सातारा, रस्ता, कोथरूड, कर्वेनगर, पाषाण, वारजे, बावधन या भागात पावसाचा जोर जास्त होता. त्या तुलनेत शहराच्या मध्य वस्तीतील पेठांमध्ये पावसाच्या तुरळक सरींनी हजेरी लावली. 

राज्यात सर्वाधिक पाऊस पुणे जिल्ह्यात झाल्याची माहिती हवामान खात्याने प्रसिद्ध केली आहे. जिल्ह्यात १ जूनपासून २८ ऑगस्टपर्यंतच्या काळात ११४ टक्के पाऊस पडला. त्याखालोखाल नाशिक आणि नंदूरबार (६७ टक्के) जिल्ह्यात पावसाची नोंद झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rain in pune city