लांबलेल्या पावसाचा तांदळाला फटका

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019

सोनामसुरी आणि कोलमला मागणी 
तमिळनाडू आणि कर्नाटकमध्ये सोनामसुरी आणि कोलमचे उत्पादन होते. तेथील तांदूळ देशभरात निर्यात केला जातो. मात्र या वर्षी या दोन्ही राज्यांतच सोनामसुरी आणि कोलमला मोठी मागणी आहे. परिणामी या दोन्ही प्रकारच्या तांदळाचे भाव वाढले असल्याचे शहा यांनी सांगितले.

मार्केट यार्ड - लांबलेल्या पावसाचा फटका तांदळाला बसला असून, बासमती वगळता अन्य सर्व प्रकारच्या भावात किलोमागे तीन ते चार रुपयांनी वाढ झाली आहे. या वर्षी पाण्याच्या टंचाईमुळे तांदळाची कमी लागवड झाली आहे. 

लागवड झाली आहे, तेथे अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही, त्यामुळे आगामी हंगामात तांदळाचे उत्पादन कमी होण्याची शक्‍यता आहे. जरी उत्पादन झाले, तरीही तांदळाचा दर्जा खालावण्याची शक्‍यता आहे. परिणामी, लागवडीनंतर जुना माल विकायचे शेतकऱ्यांनी थांबविले आहे. त्यामुळे बाजारात मागणीच्या तुलनेत तुटवडा असल्याचे दिसून येत आहे. परिणामी तांदळाचे भाव तेजीत असल्याचे व्यापारी राजेश शहा यांनी सांगितले. पावसाने हजेरी लावल्यास तांदळाच्या भावातील वाढ कमी होईल, अन्यथा भाव चढेच राहतील, अशी शक्‍यता त्यांनी वर्तविली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain Rice Cultivation