Pune Rain : पुण्यात पुन्हा पावसाला सुरुवात; कुठे धो-धो तर कुठे भूरभूर, अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Rain : पुण्यात पुन्हा पावसाला सुरुवात; कुठे धो-धो तर कुठे भूरभूर, अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प

Pune Rain : पुण्यात पुन्हा पावसाला सुरुवात; कुठे धो-धो तर कुठे भूरभूर, अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प

पुणेः मागच्या काही दिवसांपासून पुण्यासह राज्याच्या काही भागात अवकाळी पाऊस पडत आहे. आज पुन्हा पुण्यातील काही भागात पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं असून मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे.

पुण्यातील औंध, कोथरुड, बाणेर, आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द , जांभूळवाडी कोळेवाडी परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे. अवकाळी पावसामुळे पिकांसह शेतीमालाचं नुकसान होतं. पुण्यातही सामान्यांना या अवेळी पावसाचा फटका बसत आहे.

शहारतील सिंहगड रोड, बाणेर रोड, जेएम रोडवर वाहतूक कोंडी झाली आहे. पुण्याला पुन्हा एकदा पावसाने झोडपून काढले आहे. पुणे शहरासह परिसरातदेखील पाऊस बरसत आहे.

निपाणी, चिकोडीत वळीवाची विजेच्या गडगडाटासह हजेरी

निपाणी, चिकोडी शहर व परिसरात सोमवारी अचानक विजेच्या गडगडटासह सायंकाळी वळीवाने हजेरी लावली. गेल्या चार दिवसापासून वातावरणातील उष्मा वाढला होता. आज सायंकाळी आलेल्या वळीवाने नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन दिवसापासून सतत ढगाळ वातावरण होत होते. पण पावसाने हजेरी लावली नव्हती. आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. ऊन सावलीचा खेळ चालू होता. सायंकाळी सहाच्या सुमारास चिकोडी शहर व परिसरात पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली.

टॅग्स :Pune Newsrain