मराठवाड्यावर यंदा पावसाची कृपादृष्टी

rain.jpg
rain.jpg

पुणे : दुष्काळात सातत्याने होरपळणाऱया राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. राज्यात गेल्या दोन महिन्यांमध्ये सर्वाधिक पाऊस नगर येथे पडला असून, त्या खालोखाल औरंगाबाद, सोलापूर, बीड जिल्ह्यांमध्ये पाऊस नोंदला गेला. 
देशात बरोबर 1 जूनला दाखल झालेला मॉन्सून महाराष्ट्रात 20 जूनपर्यंत पोचला. त्यानंतर 31 जुलैपर्यंत राज्यात पडलेल्या पावसाच्या विश्लेषणातून ही माहिती पुढे आली आहे.

महाराष्ट्रात पाच टक्के पाऊस
यंदा महाराष्ट्रातील मॉन्सूनच्या प्रवासाला सुरवातच निसर्ग चक्रीवादळामुळे झाली. या चक्रीवादळामुळे मॉन्सूनच्या प्रवासाला वेग मिळाला. तसेच, सुरवातीच्या काळात दमदार पावसाने हजेरीदेखिल लावली. पण, त्यानंतर पावसाने दडी मारली. राज्याच्या बहुतांश भागात गेल्या दोन महिन्यांमध्ये पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडल्या. राज्यात 1 जून ते 31 जुलै या दरम्यान 538.5 मिलीमीटर पाऊस पडतो. त्याच्या तुलनेत यंदा प्रत्यक्षात पाच टक्के (563.9 मिलीमीटर) जास्त पाऊस पडला. गेल्या वर्षी सरासरीच्या तुलनेत जुलैअखेरपर्यंत सात टक्के पावसाची नोंद झाली होती. 

मराठवाड्यात दमदार पाऊस
राज्यात सर्वांत दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱया मराठवाड्यात यंदा पावसाने दमदार हजेरी लावली. गेल्या वर्षी जुलैअखेरपर्यंत भर पावसाळ्यात मराठवाडा कोरडा होता. यंदा मात्र, सरासरीपेक्षा 42 टक्के पावसाची नोंद झाली. पावसाळ्याच्या पहिल्या दोन महिन्यांमध्ये मराठवाडा या हवामान उपविभागात सरासरी 317.1 मिलीमीटर पाऊस पडतो. यंदा 449.4 मिलीमीटर पाऊस पडल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. देशात सर्वाधिक पाऊस रॉयलसिमा (119 टक्के) पडला आहे. 

पावसाने उसंत घेतल्याचे कारण
मॉन्सूनचा आस गेल्या काही दिवसांपासून हिमालयाच्या पायथ्याशी होता. त्याच स्थितीत तो बरेच दिवस असल्याने ईशान्य आणि उत्तर भारतात जोरदार पाऊस पडला. तेथे पूरस्थिती निर्माण झाली. पण, त्याच वेळी महाराष्ट्रात पावसाने ओढ दिली. 

सरसरीपेक्षा 60 टक्के जास्त पाऊस पडलेले जिल्हे
सोलापूर : 90 
नगर : 110
औरंगाबाद : 93
बीड : 88

पावसाची सरासरी ओलांडलेले जिल्हे (20 ते 59 टक्के)
मुंबई : 40
मुंबई उपनगर : 42
सिंधुदूर्ग : 33
उस्मानाबाद : 31
परभणी : 26
जालना : 53
जळगाव : 29
धुळे : 51
वाशिम : 25 

पावसाची जेमतेम सरासरी गाठलेले जिल्हे (उणे 19 ते 19 टक्के)
नाशिक : सरासरीपेक्षा 2 टक्के कमी पाऊस
ठाणे : 17 टक्के कमी पाऊस
रायगड : 16 टक्के कमी पाऊस
कोल्हापूर : 13 टक्के कमी पाऊस
पुणे : 1 टक्के कमी पाऊस
बुलडाणा : 18 टक्के कमी पाऊस
नांदेड : 1 टक्के कमी पाऊस
यवतमाळ : 19 टक्के कमी पाऊस
अमरावती : 10 टक्के कमी पाऊस
वर्धा : 2 टक्के कमी पाऊस
नागपूर : 4 टक्के कमी पाऊस
चंद्रपूर : 1 टक्के कमी पाऊस
रत्नागिरी : 2 टक्के जास्त पाऊस
सांगली : 9 टक्के जास्त पाऊस
हिंगोली : 12 टक्के जास्त पाऊस

सरासरीपेक्षा कमी पावसाचे जिल्हे (उणे 59 ते उणे 20)
पालघर : सरासरीपेक्षा 29 टक्के कमी पाऊस
नंदूरबार : 33
सातारा : 28
अकोला : 20
भंडारा : 21
गोंदीया : 45
गडचिरोली : 25

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com