खरिपाच्या खोळंबलेल्या पेरण्यांसाठी उपयुक्त पाऊस

दत्ता म्हसकर
गुरुवार, 5 जुलै 2018

जुन्नर (पुणे) : गेले दोन दिवसांत पावसाने तालुक्यत हजेरी लावली असून खरिपाच्या खोळंबलेल्या पेरण्यासाठी हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे.
पश्चिम आदिवासी भागात देखील पाऊस झाल्याने भात लावणीची चिंता दूर होण्यास मदत झाली आहे. नाणेघाट परिसरात भातलावणीची कामे सुरू झाली असून अन्य भागात लवणीसाठी जोराच्या पावसाची आवश्यकता आहे तर पेरणी झालेल्या पिकास हा पाऊस जीवदान देणारा ठरला आहे. 

तालुक्यात आज (ता.05) अखेर एकूण 1422 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जुन्नर महसूल विभागाच्या नऊ मंडल विभागातील पर्जन्यमापन केंद्रावर गुरुवारी ता.5 रोजी सकाळी आठ वाजता नोंदला गेलेला आजचा व एकूण पाऊस पुढील प्रमाणे : कंसात एकूण पाऊस आकडे मिलिमीटर मध्ये : जुन्नर 35 (141), नारायणगाव 20(116), ओतूर 21 (90), वडगावआनंद 6, (28), बेल्हे 4(219)  निमगावसावा 3 (162), डिंगोरे 35 (218), आपटाळे 35 (107),राजूर 65(341).

मागील जून मध्ये 189.10 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होतो तर 30 टक्के पेरण्या झाल्या होत्या.यावर्षी 78.0 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून अवघ्या 17 टक्केच पेरण्या झाल्या होत्या या पावसामुळे पेरणीच्या कामास गती मिळेल.

Web Title: rain is useful for kharip Sowing