तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुण्यात पावसाचे 'कमबॅक'!

टीम ई-सकाळ
बुधवार, 30 ऑक्टोबर 2019

विविध भागात आलेल्या पावसामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली. सिंहगड रस्ता, शिवणेसह कोथरूड भागामध्ये पावसाने हजेरी लावली.

पुणे : गेल्या तीन दिवसांच्या विश्रांतीवर गेलेल्या पावसाने आज पुण्यात 'कमबॅक' केले. विविध भागात आलेल्या पावसामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली. सिंहगड रस्ता, शिवणेसह कोथरूड भागामध्ये पावसाने हजेरी लावली.

गेल्या काही दिवसांपासून पुण्यासह राज्यभरात मुसळधार पाऊस बरसत आहे. ऑक्टोबर महिना सुरु असतानाही पाऊस अद्याप सुरुच आहे. मात्र, मागील तीन दिवस पाऊस थांबला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा पाऊस सुरु झाला आहे.

पुण्यातील पावसाची सद्यस्थिती

- सिंहगड रस्ता परिसरात पाऊस सुरू. जोरदार हवेमुळे पावसाचा मारा अधिक. 

- शिवणे परिसरात पाऊस सुरू

- कोथरूड भागामध्ये 15 मिनिटे पाऊस झाला. 

- मात्र, वाकडेवाडी, खडकी, बोपोडी, मुळा रोड, रेंजहिल परिसरात थोडाही पाऊस नाही.

क्यार पाठोपाठ अता 'माहा'; चक्रीवादळाचा धोका; काय आहेत अपडेट्स?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain in Various areas in Pune