शिवाराबाहेर नाही गेला पावसाचा एकही थेंब

यवतमाळ - सुभाष शर्मा यांनी शेतात सरी वरंबा पद्धतीत प्रत्येकी आठ फुटांवर ‘लॉकिंग’ केले आहे. त्यामुळे शेतात छोटे-छोटे खळगे तयार झाले आहे. पहिल्या पावसाचे पाणी या खळग्यांमध्ये साचले आहे.
यवतमाळ - सुभाष शर्मा यांनी शेतात सरी वरंबा पद्धतीत प्रत्येकी आठ फुटांवर ‘लॉकिंग’ केले आहे. त्यामुळे शेतात छोटे-छोटे खळगे तयार झाले आहे. पहिल्या पावसाचे पाणी या खळग्यांमध्ये साचले आहे.

पुणे - यवतमाळ येथील नैसर्गिक शेती पद्धतीतील प्रयोगशील शेतकरी सुभाष शर्मा यांनी सरी वरंबा पद्धती व बांधबंधिस्तीद्वारे मूलस्थानी जलसंधारणाचा प्रयोग यंदाही आपल्याही शेतात केला आहे. त्याद्वारे पावसाच्या पाण्याचा एक थेंबही शिवाराबाहेर न गेल्याचे शर्मा सांगतात. 

अनेक वर्षांपासून ते राबवित असलेल्या या पध्दतीमुळे जमिनीत दीर्घकाळ ओलावा टिकून राहण्यासह मातीत जीवाणूंची संख्या वाढतेच. शिवाय पीक उत्पादनातही वाढ होते असेही शर्मा यांचे म्हणणे आहे. 

यवतमाळ शहरापासून चार किलोमीटर अंतरावर आपल्या मित्राच्या शेतीत सुभाष शर्मा यांचे शेतीचे विविध प्रयोग सुरू आहेत. यवतमाळपासून सुमारे २० किलोमीटरवर तिवसा येथेही शर्मा यांची १० एकर शेती आहे. त्याच ठिकाणी सात एकर शेतीही त्यांनी भाडेतत्त्वावर घेतली आहे. शंभर टक्के नैसर्गिक पद्धतीने शेती, नैसर्गिक स्रोतांचे संवर्धन, जमिनीची सुपीकता टिकवणे, बहुविध पीकपद्धती, पाणीसंवर्धनाचे प्रयोग अशा विविध वैशिष्ट्यांनी त्यांची शेती नटली आहे. 

पाण्याचे उत्पादनही महत्त्वाचे
दरवर्षी कोणत्या ना कोणत्या प्रयोगात व्यग्र असलेल्या शर्मा यांनी यंदाही पाणी व माती संवर्धनाचा प्रयोग केला आहे. त्याविषयी ते म्हणाले, की यंदा राज्यात सर्वत्र दुष्काळाची स्थिती गंभीर होती. पाऊस खूप लांबला. त्यामुळे शेतकरी चिंतेत होते. त्याला मी देखील अपवाद नव्हतो. मात्र पाऊस सुरू झाला की त्याचं १०० टक्के पाणी शेतात थांबविण्यासाठी सर्व उपायोजना मी आधीच करून ठेवतो. पावसाचे पाणी थांबविण्यासाठी चार तंत्रांचा वापर मी करतो. शेती नैसर्गिक करणे हे त्यातील पहिले तंत्र आहे. याद्वारे ३० टक्क्यांपर्यंत पावसाचे पाणी थांबते. उर्वरित ७० टक्के पाणी थांबविण्यासाठी सरी वरंबा लॉकिंग पध्दत, कंटूर फार्मिंग व फळबांगात ‘ट्रेंचिंग’ अर्थात चर खोदणे या बाबींचा वापर करतो. शर्मा यांनी यंदा खरिपात सरी वरंबा पद्धतीने लागवड केली आहे. यातील एका जागी हळद, दुसऱ्या जागी तूर घेतली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com