घरात भरले पाच फूट पाणी...!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

खराडी येथील सर्व्हे नंबर २२/ १/ १ थिटेवस्ती, गल्ली नंबर १०, ललकार मित्र मंडळाजवळ, १६ घरांमध्ये शुक्रवारी जोरदार पावसामुळे नाल्याचे पाणी शिरले. पाच ते सहा फूट पाण्यामुळे येथील नागरिकांवर रात्रभर दुसऱ्याच्या घरी राहण्याची वेळ आली.

पुणे - खराडी येथील सर्व्हे नंबर २२/ १/ १ थिटेवस्ती, गल्ली नंबर १०, ललकार मित्र मंडळाजवळ, १६ घरांमध्ये शुक्रवारी जोरदार पावसामुळे नाल्याचे पाणी शिरले. पाच ते सहा फूट पाण्यामुळे येथील नागरिकांवर रात्रभर दुसऱ्याच्या घरी राहण्याची वेळ आली.

जोरदार पावसानंतर प्रत्येक वेळी हे संकट उभे राहत असल्याने नागरिकांना पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे. येथे कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाच्या मातंग आघाडीचे उपाध्यक्ष लखन कांबळे यांनी केली आहे.

खराडी येथील थिटेवस्ती या मध्यवस्तीतून वाहणाऱ्या नाल्यावर दोन्ही बाजूने नाल्यावर भिंत बांधली आहे. मात्र सुमारे वीस फूट बांधकाम राहिले आहे. त्यामुळे पाण्याचा फुगवटा वाढल्यानंतर या भगदाडातून नाल्याचे पाणी शिरले. त्यामुळे घरातील वस्तूंचे नुकसान झाले. लहान मुले, महिलांसह या कुटुंबांनी इतरत्र आसरा घेतला. सकाळी पाणी ओसरू लागल्यानंतर घरातील पाणी निघाले. 

सोनिया कांबळे, प्रशांत भंडारी, बाबू गवंडी, राजी निंबाळकर, शिवाजी डोलारे देवा साखरे, यल्लाप्पा सदापुरे सावित्री गवंडी हे घरातील पाणी, गाळ, कचरा बाहेर काढणे, नुकसान झालेले सामान फेकून देणे आदी कामांत गुंतले होते. जोरदार पाऊस झाला की या भागात पाणी शिरण्याचा प्रकार नेहमीच घडतो. त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी येथील नागरिक करीत आहे. 
 नगरसेवक महेंद्र पठारे यांना, दुसऱ्या दिवशी कळविल्यानंतर त्यांनी लगेचच पालिकेचे कर्मचारी पाठवून गल्लीतील गाळ चिखल काढून घेतला आणि नाला दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain water in Home Loss