Pune Rains : पुण्यात दिवसभर धो धो पाऊस; रात्री पावसाचा जोर वाढणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

पुणे : दिवसभर सुरू असलेल्या पावसाचा जोर रात्री आणखी वाढणार आहे. मध्यरात्री मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर शहरासह उपनगरांत पावसाने पुन्हा पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे पुणेकरांनो, लवकर घरी परता. ​

Pune Rains : पुणे : दिवसभर सुरू असलेल्या पावसाचा जोर रात्री आणखी वाढणार आहे. मध्यरात्री मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर शहरासह उपनगरांत पावसाने पुन्हा पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे पुणेकरांनो, लवकर घरी परता.

शनिवारी सकाळपासूनच जोरदार पाऊस पडत आहे. त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावर झाल्याचा दिसते. शहराच्या मध्यवस्तीतील पेठांसह खडकवासला, धायरी, आनंद नगर, हिंगणे, राजाराम पूल, कात्रज, धनकवडी, सिंहगड रस्ता, धायरी, नऱ्हे वडगाव, लष्कर भाग, वानवडी, विमाननगर अशा उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे तर, सिंहगड रस्ता परिसरात रस्त्यावर पाणी साठण्यास सुरवात झाली आहे. पावसामुळे शहरातील वाहतूक संथगतीने सुरू आहे.

Image may contain: 1 person, standing and outdoor
पुणेकरांना लवकर घरी पोहचा

दुपारी चारनंतर आकाश काळ्या कुट्ट ढगांनी व्यापले असल्याचे स्पष्ट दिसते. त्यामुळे रात्रीच्यावेळी वादळीवाऱ्यासह ढगांचा गडगडाट करत पावसाच्या मुसळधार सरी कोसळतील, असा इशारा हवामान खात्यातर्फे देण्यात आला आहे. त्यामुळे पुणेकरांनो कार्यालयातून सुटल्यावर घरी लवकर परत जा. पावसात अडकलाच तर झाडाखाली किंवा झाडाच्या जवळपासही थांबू नका. 

pune Rain


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain will increase at night in pune