दिवाळीतही पावसाची शक्‍यता 

दिवाळीतही पावसाची शक्‍यता 

पुणे - शहर परिसरात यंदाच्या दिवाळीत पावसाच्या हलक्‍या सरी पडतील. मध्य महाराष्ट्रात पुढील चोवीस तासांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने वर्तविला आहे. 

शहरात दिवसभर आकाश ढगाळ होते. पावसाच्या एक-दोन सरींनी बुधवारी हजेरी लावली. मंगळवारी सकाळी साडेआठ ते बुधवारी सकाळी साडेआठ या चोवीस तासांमध्ये पुण्यात 13 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे 1 ते 23 ऑक्‍टोबर 212 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रूपांतर होण्याचे संकेत आहेत. हे चक्रीवादळ किनारपट्टीकडे येऊन पुन्हा खोल समुद्राकडे जाण्याची शक्‍यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात गुरुवारी (ता. 24) तुरळक ठिकाणी मुसळधार, तर उर्वरित महाराष्ट्रात हलक्‍या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

दरम्यान कोकण, गोवा, कर्नाटकमध्ये जोरदार वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीवर वेगाने वारे वाहून समुद्र खवळणार आहे. तर, बंगालच्या उपसागरातील ठळक कमी दाब क्षेत्रामुळे आंध्र प्रदेश, तेलंगण, ओडिशातही जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. 

तापमानात चढ-उतार 
पावसाळी हवामानामुळे आकाशात ढग जमा होत आहेत. अधूनमधून पडणाऱ्या उन्हामुळे चटकाही जाणवत असल्याने तापमानात चढ-उतार सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी खालावलेले तापमान पुन्हा वाढल्याचे हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com