पुण्यातील धरणांत 13 तासात वाढला महिनाभराचा पाणीसाठा

राजेंद्रकृष्ण कापसे
शनिवार, 27 जुलै 2019

पानशेत धरणात 6.96 टीएमसी म्हणजे 65.39 टक्के पाणीसाठा झाला आहे. वरसगाव धरणात 6.75 टीएमसी 52.67 टक्के पाणीसाठा झाला आहे. टेमघर धरणात 1.71 टीएमसी म्हणजे 46.05 पाणीसाठा जमा झाला आहे. चार धरणात मिळून 16.74 टीएमसी म्हणजे 57.43 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. 

पुणे : पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी क्षेत्रात शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता 15.39 टीएमसी पाणीसाठा होता. तो आज सकाळी सहा वाजता 16.74 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. म्हणजे 13 तासात सुमारे दीड टीएमसीची वाढ झाली आहे. एका रात्रीत महिनाभर पुरेल एवढे पाणीसाठा जमा झाले आहे.

चार धरण क्षेत्रात जोरदार पावसाला सुरुवात झाली असून, मागील 24 तासातील पाऊस (मिलीमीटर मध्ये) खडकवासला 76, पानशेत 147, वरसगाव 145, टेमघर 170 पडला आहे. खडकवासला धरणात 1.32 टीएमसी म्हणजे 66.84 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. कालव्यातुन 1029 क्यूसेक पाणी सोडले आहे. 

पानशेत धरणात 6.96 टीएमसी म्हणजे 65.39 टक्के पाणीसाठा झाला आहे. वरसगाव धरणात 6.75 टीएमसी 52.67 टक्के पाणीसाठा झाला आहे. टेमघर धरणात 1.71 टीएमसी म्हणजे 46.05 पाणीसाठा जमा झाला आहे. चार धरणात मिळून 16.74 टीएमसी म्हणजे 57.43 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rainfall in Pune water storage in dams area