पावसाचा जोर वाढणार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 ऑगस्ट 2018

पुणे : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाला अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार आहे. रविवारपासून (ता.26) कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, आग्नेय विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. 

गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. अनेक भागांत पावसाची उघडीप आहे, तर तुरळक ठिकाणी हलक्‍या ते श्रावण सरींची हजेरी लागत आहे. पश्‍चिम बंगाल आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे उत्तर ओडिशा किनाऱ्यावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. या कमी दाब क्षेत्राची तीव्रता रविवारी वाढण्याची शक्‍यता आहे, तर ओडिशा, झारखंड, छत्तीसगडमध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. राज्यातही मंगळवारपर्यंत (ता. 28) अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. 

Web Title: Rainfall will increase