मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

- 'क्‍यार'ची तीव्रता कमी, "महा' चक्रीवादळ पूर्व-मध्य अरबी समुद्रावर

पुणे : अरबी समुद्रावरील 'क्‍यार' चक्रीवादळाची तीव्रता आता कमी झाली असून, त्याचे रुपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे. तसेच, लक्षद्वीपसह लगतच्या अरबी समुद्रावरील "महा' चक्रीवादळ पूर्व-मध्य अरबी समुद्रावर घोंगावत आहे. परिणामी राज्यात शनिवारी (ता.2) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा इशारा पुणे वेधशाळेकडून देण्यात आला आहे.

गेल्या 24 तासांत कोकण-गोवा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी, मराठवाड्यात काही तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस झाला. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. तर, मराठवाड्यात काही भागात किंचित घट झाली आहे.

येत्या 3 आणि 4 नोव्हेंबर रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता वेधशाळेकडून वर्तविण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raining may in Marathwada with lightning