माणिकडोह वडजच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ

दत्ता म्हसकर
सोमवार, 16 जुलै 2018

माणिकडोह, वडज धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या जोरदार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होत आहे. गेले दोन दिवसांपासून मीना व कुकडी नदीच्या खोऱ्यात पावसाचे प्रमाण वाढले असल्याने ओढे, नाले, धबधबे खळखळून वाहू लागले आहेत. दोन्ही नदीच्या पात्रात वेगाने पाणी येत असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
 

जुन्नर- माणिकडोह, वडज धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या जोरदार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होत आहे. गेले दोन दिवसांपासून मीना व कुकडी नदीच्या खोऱ्यात पावसाचे प्रमाण वाढले असल्याने ओढे, नाले, धबधबे खळखळून वाहू लागले आहेत. दोन्ही नदीच्या पात्रात वेगाने पाणी येत असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

माणिकडोह धरणात दुपारी 3 वाजेपर्यंत 2800 दशलक्ष घनफुट उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. 2300 दशलक्ष घनफुट नवीन पाणी आले असून धरणाची टक्केवारी 28 टक्के इतकी झाली असल्याचे शाखा अभियंता काशीनाथ देवकर यांनी सांगितले. वडज धरणात देखील वेगाने पाणी येत असून सांडव्यावरून नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. नदी काठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

तालुक्यात आज सोमवारी 384 मिलिमीटर व सरासरी 42.6 मिलिमीटर तर एकूण 3054 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Web Title: raining news in junnar taluka dist pune

टॅग्स