esakal | Indapur : ऑक्टोबरच्या पावसाने इंदापूरच्या शेतकऱ्यांना तारले
sakal

बोलून बातमी शोधा

Indapur : ऑक्टोबरच्या पावसाने इंदापूरच्या शेतकऱ्यांना तारले

Indapur : ऑक्टोबरच्या पावसाने इंदापूरच्या शेतकऱ्यांना तारले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वालचंदनगर : इंदापूर तालुक्यामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तालुक्यातील ओढे-नाले खळखळून वाहू लागल्याने शेतकरी वर्ग समाधानी झाला आहे. सप्टेंबर महिन्याअखेरीपर्यंत इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागामध्ये पावसाने पाठ फिरवली होती. समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त होता. ओढे नाले खळखळून वाहिले नव्हते. गणेशउत्सवामध्ये चांगला पाउस पडेल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती.

हेही वाचा: सहा 'ZP'त भाजपला २३, तर महाविकास आघाडीचा ४६ जागांवर विजय

मात्र पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकऱ्यांना उभ्या पिकांची व रब्बीतील पिकांच्या पेरणीची काळजी लागली होती. ऑक्टोबर महिना सुरु होताच पावसाने दमदार हजेरी लावली. तालुक्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये दोन दमदार पाऊस झाले असून ओढे -नाले खळखळून वाहू लागले आहे. चालू वर्षीच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच ओढे नाले वाहिल्यामुळे शेतकरी समाधानी झाले आहेत. उभ्या पिकांना जीवदान मिळाले असून रब्बीतील पेरण्यांची चिंता कमी झाली आहे.

तसेच उस उत्पादक शेतकऱ्यांना ही दिलासा मिळला असून उसाच्या रखडलेल्या नवीन लागवडी सुरु होतील. तसेच कमी पावसामुळे उसाची वाढ कमी प्रमाणात झाली होती. ऑक्टोबरच्या पावसाने उसाची वाढ व वजन वाढण्यास मोलाची मदत होणार आहे.

हेही वाचा: रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार दोघांना; हे आहेत मानकरी

इंदापूर तालुक्यामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेला आजपर्यंत पाऊस व कंसात चालू वर्षीचा पाऊस मि.मी.मध्ये

सणसर -८५ ( ३७०),

अंथुर्णे - १४३ (४८६) ,

निमगाव केतकी - १३६ (६०८),

बावडा १२३ (६३९)

loading image
go to top