पुण्यात पावसाच्या जोरदार सरी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 एप्रिल 2018

पुणे - वादळी वाऱ्यासह पडलेल्या पूर्वमोसमी पावसाने पुणेकरांना रविवारी सुटीच्या दिवशी चिंब-चिंब भिजवले. उन्हाच्या चटक्‍यात होरपळून निघणाऱ्या पुणेकरांना यामुळे दिलासा मिळाला. दुपारनंतर पाषाण, कोथरूड, धायरी, कात्रज, धनकवडी, नगर रस्ता या भागांत पावसाच्या सरींनी हजेरी लावली. जिल्ह्याच्या बहुतांश भागांतही वादळी-वाऱ्यासह ढगांचा गडगडाट रात्री उशिरापर्यंत सुरू होता. पुण्यात कमाल तापमानाचा पारा 36.8 अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाला. 

शहरात सकाळपासून उन्हाचा चटका जाणवत होता. दुपारी दोननंतर आकाशात ढग दाटून आले. अर्ध्या-एक तासात सूर्य ढगांच्या आड गेला. त्यामुळे उन्हाच्या चटक्‍याची तीव्रता कमी झाली. वादळी वारे सुटले. ढगांचा गडगडाट सुरू झाला. वीज कडाडण्याच्या आवाजाने लहान मुले सोसायट्यांच्या आवारात पावसाचे स्वागत करण्यासाठी गोळा होऊ लागली. काही वेळांतच मुसळधार सरी कोसळू लागल्या. रस्त्यांवरून पाणी वाहून लागले. सुमारे अर्धा-पाऊण तास पडलेल्या पावसात सोसायटीतील मुले नाचत पावसाचा आनंद घेत असल्याचे दृष्य दिसत होते. शहराच्या मध्य वस्तीत आणि पूर्व भागात पावसाने हजेरी लावली नाही. 

शहर आणि परिसरात येत्या सोमवारी (ता. 9) आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे चाळिशीच्या दिशेने झेपावलेला कमाल तापमानाचा पारा कमी राहील. कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. 

Web Title: rainy season in Pune