शहरात आजही पावसाळी हवामान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

पुणे - बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले वरदा चक्रीवादळ पूर्व कर्नाटकच्या भागात शमले असले तरीही त्याबरोबर आलेल्या बाष्पामुळे शहराने बुधवारी दिवसभर पावसाळी वातावरण अनुभवले. काही भागांत पावसाच्या हलक्‍या सरींनी हजेरी लावली. पुढील चोवीस तासांमध्येही शहर आणि परिसरातील काही भागांत पावसाच्या हलक्‍या सरींची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे. 

वरदा चक्रीवादळाबरोबर आलेले बाष्प दक्षिण कोकण आणि दक्षिण-मध्य महाराष्ट्रावर जमा झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून पुणे परिसरातही ढगाळ वातावरण निर्माण झाले. पुढील चोवीस तास हे वातावरण कायम राहणार आहे. शहरात मंगळवारी रात्रीपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने किमान तापमान १०.२ वरून १५.४ अंश सेल्सिअसपर्यंत म्हणजे ४.२ अंश सेल्सिअस इतके वाढल्याची माहिती हवामान खात्याने दिली. सकाळपासून कात्रज, धनकवडी, सिंहगड रस्ता, पाषाण, कोथरूड, पुणे विद्यापीठ या परिसरात पावसाच्या हलक्‍या सरी पडल्या. शहर परिसरातील शिंदेवाडी, नऱ्हे, शिरवळ या भागात पाऊस पडला.

Web Title: Rainy weather today in the city