भाजपला मत देण्यासाठी घरावर भाजपचा झेंडा उभारा : जावडेकर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 जानेवारी 2019

पुणे : ''भाजपला मत द्यायचे आहे, तर मग घराच्या छतावर भाजपचा झेंडा उभारा'' , असे आवाहन भाजप समर्थकांना करत ‘मेरा घर भाजप का घर’हा नवा कार्यक्रम येत्या दोन महिन्यात भाजपचा घेणार असल्याची माहिती मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषेदेत केले. 

मोदी सरकाराची कामे आणि दिल्लीचे झालेले भाजपचे अधिवेशन याबाबत माहिती देण्यासाठी पुण्यात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले देखील उपस्थित होते. 

ते म्हणाले, ''आगामी निवडणुका मजबूत सरकार की मजबूर सरकार या मुद्यावर होणार आहे. मोदी यांनी देशाला मजबूत सरकार दिले. तेव्हाच विरोधक मात्र, मजबूर सरकार देण्याच्या प्रयत्नात आहेत. निवडणुकांसाठी विरोधकांकडे नेता नाही. त्यांच्याकडे ठोस मुद्दे, अजेंडा नाही. केवळ 'मोदी हटाव' हाच त्यांचा अजेंडा आहे. निवडणुकांआधीच विरोधक हताश झाले आहेत. त्यातूनच ते 'ईव्हीएम'ला दोष देत आहेत. 

पुढील निवडणुकीत भाजपचे खासदार वाढतील आणि मतांची टक्केवारी वाढेल. मोदी नसतील तर अराजकता असेल, त्यामुळे मोदी की अराजकता हवी? राफेल म्हणजे राहुल फेल, न्यायालयाच्या निर्णयानंतरही काँग्रेस चुकीची माहिती देत आहे. ते लोकांना कळते. भाजपला मत द्यायचे आहे तर मग घराच्या छतावर भाजपचा झेंडा उभारा असे आवाहन भाजप समर्थकांना करत ‘मेरा घर भाजप का घर’ हा नवा कार्यक्रम येत्या दोन महिन्यात भाजपचा घेणार असल्याची माहिती त्यांनी वेळी दिली.

Web Title: Raise BJP's flag at home for BJP's vote: Javadekar