esakal | देखाव्‍यांच्या माध्यमातून मतदार जागृती करा
sakal

बोलून बातमी शोधा

Ganapati

देखाव्‍यांच्या माध्यमातून मतदार जागृती करा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सर्व गणेश मंडळांनी गणेशोत्सवाच्या काळात मतदार जनजागृतीविषयक देखाव्यांचे सादरीकरण करण्यावर अधिक भर द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सर्व गणेश मंडळांचे अध्यक्ष आणि प्रतिनिधींना केले. मतदार जनजागृतीसाठी सर्वोत्कृष्ट ठरणाऱ्या देखाव्यांबाबत संबंधित गणेश मंडळांना राष्ट्रीय मतदारदिनी गौरविण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केले.

शहर व जिल्ह्यात गणेशोत्सवाची मोठी परंपरा आहे. गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांमध्ये जनजागृतीचे मोठे कार्य गणेश मंडळाच्या माध्यमातून होत असते. त्यामुळे पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील गणेश मंडळांनी मतदार जनजागृतीबाबतच्या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन देशमुख यांनी केले.

हेही वाचा: आमचे कार्यकर्ते थुंकले तरी सरकार वाहून जाईल- भाजप नेत्या

जिल्हाधिकारी देशमुख यांनी शहर, जिल्ह्यातील गणेश मंडळाचे अध्यक्ष व प्रतिनिधीसोबत स्वीप कार्यक्रम स्पर्धा आणि मतदार जनजागृतीबाबत बैठक झाली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत, मतदार नोंदणी अधिकारी संतोषकुमार देशमुख आणि जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने उपस्थित होते.

देखावे स्पर्धेचे विषय

  1. नागरिकांना नावनोंदणी व मतदानाचे महत्त्व समजावून सांगणे

  2. वयाची १८ वर्ष पूर्ण झालेल्या नवमतदारांना नोंदणीसाठी

प्रोत्साहित करणे

  1. महिलांना त्यांच्या मतदानाच्या हक्काविषयी जागृत करणे

  2. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, वंचित घटक, हे लोकशाहीचा अमूल्य घटक आहेत, याची त्यांना जाणीव करून देणे

हेही वाचा: गणेशोत्सव, ईद, दिवाळीसाठी केंद्राची मार्गदर्शक सूचना

युवक, दिव्यांग, शहरी नागरिक, स्थलांतरित, ग्रामीण व आदिवासी नागरिक, तृतीयपंथी आणि महिला आदींना मतदान प्रकियेत सहभागी व्हावे, यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने मतदार जनजागृतीबाबतचा स्वीप कार्यक्रम राबविण्यात येत आहे. नवमतदारांसह सर्व मतदारांची नोंदणी वाढविण्यासाठी हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी गणेश मंडळाचा सहभाग महत्त्वाचा ठरेल.

- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी

loading image
go to top