Raj Bhavan Pune : पुण्यातील राजभवनाचा इतिहास तुम्हाला माहितीये काय? अशी आहे रंजक कहाणी

महाराष्ट्रातील पुण्यातील राजभवनाचा इतिहास नेमका काय हे तुम्हाला माहितीये काय?
Rajbhavan Pune
Rajbhavan Puneesakal

Rajbhavan History : आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांचा राजीनामा स्वीकार केलाय. राज्यपाल यांचे निवासस्थान म्हणजे राजभवन. राजभवन म्हटले की सहसा राजकारणासंबंधी विषयांची चर्चा होते. अधूनमधून राजभवनातील राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोरांची छवी वर्तमानपत्रात छापून येते व राजभवनाच्या सौंदर्याची चर्चा होते. परंतु महाराष्ट्रातील पुण्यातील राजभवनाचा इतिहास नेमका काय हे तुम्हाला माहितीये काय?

महाराष्ट्र राजभवन हे देशातील सर्वाधिक जुने राजभवन आहे. पूर्वाश्रमीचे ‘गव्हर्नमेंट हाऊस’ असलेल्या राजभवनाला मोठा इतिहास लाभला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील हा इतिहास माहितीपट- चित्रपट रूपाने लोकांसमोर येणे गरजेचे आहे. असे आवाहन सुद्धा भगतसिंग कोश्यारी यांनी केले होते.

पुण्यातील गणेशखिंड नाव उच्चारले की आज बहुतेकांच्या नजरेसमोर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येते. परंतु स्वातंत्र्यापूर्वी गणेशखिंड म्हटले की लोकांना मुंबई प्रांताच्या गव्हर्नरचे पुणे येथील पावसाळी निवासस्थान ‘गव्हर्नमेंट हाउस’ आठवत असे. गणेशखिंडीचा उल्लेख आला की दिनांक २२ जुन १८९७ रोजी रात्री घडलेल्या एका घटनेची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.

पुण्यात प्लेगची साथ आली असताना प्लेग नियंत्रणाच्या नावाखाली पुण्याच्या नागरिकांवर अत्याचार केल्यामुळे पुण्याच्या जनतेच्या रोषाचे धनी ठरलेल्या वाल्टर चार्ल्स रँड यांचेवर त्या रात्री चाफेकर बंधूंनी हल्ला केला होता. रँड हे प्लेग नियंत्रण अधिकारी ‘गव्हर्नमेंट हाउस’ गणेशखिंड येथून इंग्लंडच्या राणीच्या राज्याभिषेकाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित समारंभाला उपस्थित राहून परतत होते. त्यावेळची ही गोष्ट आहे.

एव्हाना पुणे ही पश्चिम भारताची दुसरी राजधानी झाली होती. लष्कर तसेच अनेक सरकारी विभागांचे मुख्यालय झाले होते. याबद्दल म्याक्लिन यांनी १८७५ साली असा अभिप्राय लिहिला आहे : “ पुणे येथे भारतातील गव्हर्नर लोकांच्या शाही निवासांपैकी सर्वोत्तम असे निवासस्थान आहे. तसेच पश्चिम भारताची संसद बसू शकेल इतके प्रशस्त परिषद सभागृह आहे. मात्र प्रत्यक्षात त्या ठिकाणी वर्षातून जेमतेम तीन चार वेळा डझनभर विधायक बसतात.”

गणेशखिंड येथे नव्याने बांधून पूर्ण झालेले व सन १८७१ साली निवासायोग्य झालेले गव्हर्नमेंट हाउस पाहून मॅक्लिन प्रभावित झाले.

Rajbhavan Pune
Governor Salary : राज्यपालांचं मासिक मानधन किती? त्यांना कोणत्या सुविधा मिळतात? जाणून घ्या

महाबळेश्वर येथील निवासस्थान ब्रिटिशांनी केवळ मुंबई येथील उष्ण व दमट हवामानापासून आराम मिळावा या हेतूने बांधले होते, मात्र पुणे येथे गव्हर्नर्मेंट हाउस बांधण्यामागे राजकीय उपयुक्तता हा एल्फिनस्टन यांचा मुख्य हेतू होता. पुण्याच्या निवासस्थानाचा त्यांच्या दृष्टीने आणखी एक फायदा असा होता की पावसाळ्यात पुण्याचे हवामान इंग्लंडच्या उन्हाळ्याप्रमाणे आल्हाददायक होते.

अनेकदा प्रवासाची दगदग आणि बेभरवश्याचे हवामान असले तरी देखील, एल्फिनस्टन मुंबई आणि परळ पासून दूर राहणे पसंत करीत असे दिसते. त्यांनी मलबार पोइंट येथे एक दुमदार कुटी बांधली तर खंडाळा येथे बंगला बांधला. अनेकदा ते नयनरम्य देखावा व थंडगार हवामान असलेल्या घोडबंदर येथे एका लहानग्या परंतु सुंदर हवेलीमध्ये मित्रांसमवेत राहत असे. (Governor)

नोट - वरील लेख हा माहितीच्या आधारे घेतला आहे. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com